'अपोलो' मोहिमेनंतर तब्बल ५0 वर्षांनी नासाची 'आर्टेमिस २' ही मानवी चांद्रमोहीम यशस्वीपणे पार पडली. ११ दिवसांचा थरारक प्रवास करून चार अंतराळवीर पृथ्वीवर सुरक्षित परतले आहेत.
मोहिमेतील महत्त्वाचे टप्पे
उड्डाण १ एप्रिल २०२६ रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेट SLS (Space Launch System) द्वारे उड्डाण झाले.
विक्रमी प्रवास १० दिवसांच्या या मोहिमेत अंतराळवीरांनी पृथ्वीपासून ४ लाख २३ हजार २३९ कि.मी. इतक्या विक्रमी अंतरापर्यंत मजल मारली आणि चंद्राच्या मागच्या बाजूचे (Far Side) दर्शन घेतले.
चंद्र दर्शन व सूर्यग्रहण अंतराळवीरांनी चंद्राच्या पलीकडून सूर्यग्रहण पाहिले आणि त्याचे दुर्मिळ फोटो काढले.
परतीचा प्रवास ७ एप्रिलला चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून यान पृथ्वीकडे निघाले. ११ एप्रिल रोजी पहाटे ताशी ४० हजार कि.मी. वेगाने यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला.
तांत्रिक वैशिष्ट्ये व सुरक्षा

ओरियन कुपी (Capsule): अंतराळवीर ज्या सुरक्षित कुपीत बसले होते, तिला 'ओरियन' असे नाव देण्यात आले आहे.

संरक्षण कवच (Heat Shield): वातावरणात प्रवेश करताना घर्षणामुळे तापमान २७६०°C पर्यंत वाढले होते, परंतु 'हिट शील्ड'मुळे अंतराळवीरांना कोणताही धक्का बसला नाही.

लँडिंग: अकरा पॅराशूटच्या मदतीने ओरियन कुपी कॅलिफोर्नियाजवळ पॅसिफिक महासागरात अलगद उतरली.

ही मोहीम कशासाठी होती?
ही मुख्यत्वे एक चाचणी मोहीम होती. ओरियन कुपी आणि त्यातील यंत्रणा अंतराळात किती सुरक्षित राहतात, हे तपासणे हा याचा मुख्य उद्देश होता. या यशानंतर आता पुढील मोहिमांमध्ये (आर्टेमिस ३ व ४) मानवाचे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणे आणि तिथे बर्फाचा शोध घेणे सुलभ होणार आहे.